बिबट्या घुसला शाळेत... - Marathi News 24taas.com

बिबट्या घुसला शाळेत...

www.24taas.com, मुंबई
 
मुलुंडमधल्या NES शाळेत बिबट्या शिरला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा बिबट्या शाळेच्या खिडकीतून आत घुसला. त्यामुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
 
सुरक्षा रक्षकाने आज बिबट्याला पाहिल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापकांना त्याच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हा बिबट्या आला, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
शाळेच्या बेसमेंटमध्ये असलेल्या एका गोदामामध्ये बिबट्या लपला असल्याचं वनअधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठा त्रास होत आहे.
 
 
 
 

First Published: Saturday, April 21, 2012, 18:26


comments powered by Disqus