Last Updated: Monday, April 23, 2012, 12:36
www.24taas.com, मुंबई अरुण टिक्कू हत्येप्रकरणी आता आणखी एकाला अटक करण्यात आलीय स्टॉक ब्रोकर गौतम वोराला क्राईम ब्रांचनं अटक केली आहे.
विजय पालांडेला मदत केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विजय पालांडेला पोलीस कोठडीतून पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यापूर्वी मॉडेल विवेका बाबाजी हिच्या आत्महत्येप्रकरणी देखिल गोतमची चौकशी करण्यात आली होती. तसंच टिक्कू आणि करण कक्कड हत्येप्रकरणात अडकलेल्या सिमरन सूदशीही त्याचे संबंध होते, यातही त्याची चौकशी करण्यात आलीय. विजय पालांडे हा अरूण टिक्कू आणि करण कक्क़ड या दोन हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे.
संबंधित आखणी बातम्या 
पोलिसांना चकवा दिलेला विजय पालांडे अटकेतओशिवरा अरुण टिक्कू हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विजय पालांडे हा फरार झाला काल फरार झाला होता. विशेष म्हणजे त्यांने क्राईम ब्रांच पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. या प्रमुख आरोपीला पुन्हा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणी ३ आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.
.
.

पोलिसांच्या कचाट्यातून खुनी पालांडे फरारओशिवरा अरुण टिक्कू हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाला आहे. विजय पालांडे असं या आरोपीचं नाव असून, क्राईम ब्रांचच्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. या प्रकरणी ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
First Published: Monday, April 23, 2012, 12:36