जे डे हत्त्याप्रकरणी महिला पत्रकाराला अटक - Marathi News 24taas.com

जे डे हत्त्याप्रकरणी महिला पत्रकाराला अटक

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
पत्रकार जे.डे.हत्याकांड प्रकरणी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.  जिग्ना व्होरा असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. या महिला पत्रकारानेच 'जेडे' यांच्याबद्दलची माहिती छोटा राजनला जेडेंच्या घराचा पत्ता आणि बाईकचा नंबर दिल्याचा आरोपही या महिला पत्रकारावर आहे.
 
छोटा राजन विरोधात लिहलेले लेख राजनला पुरवणे, छोटा राजनच्या मनात जेडे यांच्याविषयी द्वेष निर्माण करणे, असे आरोप या महिला पत्रकारावर आहेत.या महिलेला अटक करण्यात आली असून या महिलेला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
 
क्राईम रिपोर्टर जे.डे. यांची काही दिवसांपूर्वी पवई भागात त्यांच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती.
 
 
 

First Published: Friday, November 25, 2011, 08:39


comments powered by Disqus