Last Updated: Wednesday, April 25, 2012, 19:13
www.24taas.com, मुंबई गेल्या दोन दशकांपूर्वी देशाला हादरविणाऱ्या बोफोर्स प्रकरणात महानायक अभिताभ बच्चन यांना क्लिन चीट मिळाल्यानंतर नेहमी सत्याचा विजय होतो, हे स्पष्ट झाले असले तरी या कालावधीत कोणत्या परिस्थितीतून जावे लागले त्याची भरपाई करणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.
बीग बी यांनी आपल्या ब्लॉगवर झालेल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. तथ्य आणि सत्याच्या विजयाची वेळ.... जीवनात अशा बऱ्याच अडचणी आल्या, पण असेही झाले की वास्तविकतेला बाजुला ठेवून माझ्यावर आरोप झाले, ज्याची सुतराम शक्यता नव्हती. हे दुर्दैवी होते. जेव्हा वादळाचा झंझावात असेल तर त्यावेळी त्याचाशी सामना करण मुर्खपणाचे लक्षण असते.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या पदाचा वापर केल्याचा दावा स्वीडनचे माजी पोलिस अधिकारी स्टेन लिंडस्ट्रोम यांनी एका मुलाखतीत केला आहे. लिंडस्ट्रोम यांनी अमिताभ बच्चन यांना क्लीन चीट दिली आहे.
या घटनेच्या २५ वर्षांनंतर मला वाचायला मिळते की, मी निर्दोष आहे. आणि हे कोणाकडून ऐकतो आहे, की ज्या व्यक्तीने आरोप लावण्यात आणि त्याची चौकशी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
First Published: Wednesday, April 25, 2012, 19:13