मुंबईमध्येही 'हॉरर किलींग'! - Marathi News 24taas.com

मुंबईमध्येही 'हॉरर किलींग'!

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतल्या गोवंडी भागात धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका बापाने आपल्याच 19 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. या मुलीचं त्यांच्याकडे राहणा-या भाडेकरुवर प्रेम होतं. यातुनच तिचा खून केल्याचं समोर येतंय.
 
19 वर्षांच्या निरागस तब्बसुम खातून तिच्याच पित्यानं तिची हत्या केली आहे. तिचा गुन्हा इतकाच की तिने प्रेम केलं. त्यांच्याच भाडेकरुच्या ती प्रेमात पडली आणि त्याच्याशीच तिला लग्न करायचं होतं पण तिचे वडील किताबुद्दीन यांना ते मान्य नव्हतं. ते तब्बसुमचा निकाह गावाला जाऊन करुन टाकणार होते. यावरुनच बाप-लेकीत कडाक्याचं भांडण झालं आणि निर्दयी बापाने तिचं डोकं भिंतीवर आपटून तिची हत्या केली.
 
इतक्यावर न थांबता किताबुद्दीन आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन रुग्णालयात पोचला आणि तिथे मुलीला टीबी झाल्याचं सांगत राहिला. पण रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि या किताबुद्दीनच्या कृत्याचा पर्दाफाश झाला. आता किताबुद्दीन आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहे. पण सातारा आणि जळगावनंतर मुंबईत अशी घटना घडल्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय.

First Published: Wednesday, April 25, 2012, 19:59


comments powered by Disqus