'आदर्श'च्या 'क्लीन चीट'वरुन सोमैया आक्रमक - Marathi News 24taas.com

'आदर्श'च्या 'क्लीन चीट'वरुन सोमैया आक्रमक

www.24taas.com, मुंबई
 
आदर्श प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्यांना क्लिन चीट मिळाली असं काँग्रेसनं एकिकडे बोलायला सुरुवात केलीय आणि याच सगळ्या प्रकारावरती भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टीका केलीय.
 
क्लिन चीट घोषीत करुन आदर्श प्रकरण दडपण्याचा तसंच अशोक चव्हाण यांची अटक टाळण्यासाठी त्यांची ही सगळी बनवाबनवी सुरु आहे अशी टीका किरिट सोमय्या यांनी केलीय. तसंच त्यांनी काँग्रेस सरकारला काही प्रश्नदेखील विचारले आहेत.
 
15 महिने आणि 9 अधिका-यांच्या अटकेनंतर एकाही राजकारण्याला अटक का झाली नाही ? ज्या ज्या अधिकारी आणि मंत्र्यांच्या टेबलवरुन फाईल गेली त्या प्रत्येकाने फ्लॅट घेतला हे खरे नाही का ? MMRDA आणि पर्यावरण मंत्रालयाने आणि नगर नियोजन मंत्रालय यांनी परवानगी दिली आहे हे खरे नाही का? अशोक चव्हाण यांनी त्यांचे सासरचे नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर फ्लॅट घेतले हे खरे नाही का ? असे प्रश्न उपस्थित करत राज्यपालांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं.

First Published: Wednesday, April 25, 2012, 22:47


comments powered by Disqus