Last Updated: Saturday, November 26, 2011, 08:10
झी २४ तास वेब टीम, मुंबई २६/११ च्या हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पूर्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनीच याची कबुली दिली आहे. मुंबईच्या सागरी सीमा पूर्णःत सुरक्षित नसल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त आरुप पटनाईक यांनी म्हटलंय.
सागरी हद्दीच्या सुरक्षेसाठी २५ सागरी पोलीस ठाण्यांना कोट्यवधी रुपयांची सामुग्री देण्यात आली. मात्र अत्याधुनिक यंत्रणा हाताळण्यासाठी कुशल कर्मचारी नसल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय. सागरी सुरक्षेची तीन वर्षांपूर्वी जी स्थिती होती त्यापेक्षा आत्ताची स्थिती उत्तम असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलंय.
सागरी सीमा सुरक्षित नाहीत आणि पुन्हा दहशतवादी समुद्रमार्गे येत असतील तर त्यांना रोखता येईलच असं सांगता येणार नाही असं पटनायक म्हणाले. पोलिसच सागरी सुरक्षेची पूर्ण हमी देत नसल्यानं मुंबईकर दहशतीच्या छायेखाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
First Published: Saturday, November 26, 2011, 08:10