Last Updated: Friday, April 27, 2012, 19:31
www.24taas.com, मुंबई 
सचिन तेंडुलकरची राज्यसभेवर नियुक्ती होणार हे निश्चित झाल्यानंतर त्यावरून राजकारण चागंलच तापलं. सचिनला काँग्रेसपासून सावध राहण्याचा सल्ला शिवसेनेनं दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात दिवसभर प्रतिक्रिया उमटत राहिल्या.
या सगळ्या गदारोळानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सचिनच्या नियुक्तीला शिवसेनेचा विरोध नाहीच, अशी स्पष्ट भूमिका 'झी २४ तास'कडे मांडली आहे. 'झी २४ तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत उद्धव यांनी सचिनच्या नियुक्तीचं स्वागत तर केलंच, पण सचिन मैदानाप्रमाणं संसदही गाजवेल अशा शुभेच्छा दिल्या.
सचिनला खासदार करण्याआधी त्याला भारतरत्न द्या अशी मागणी त्यांनी केली. अर्थात काँग्रेसनं सचिनच्या लोकप्रियतेचा राजकीय फायदा उठवू नये, असं सांगत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
First Published: Friday, April 27, 2012, 19:31