गोडी पार्श्वनाथ जैन मंदिराची द्विशताब्दी वर्षपूर्ती - Marathi News 24taas.com

गोडी पार्श्वनाथ जैन मंदिराची द्विशताब्दी वर्षपूर्ती

www.24taas.com, मुंबई
 
ऐतिहासिक गोडी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या द्विशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातले जैन धर्मगुरु आणि भाविक इथं दाखल झालेत.
 
दक्षिण मुंबईतल्या काळबादेवी परिसरातलं भगवान गोडी पार्श्वनाथ जैन मंदिर... दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंदिराला अशाप्रकारे सजवण्यात आलंय...खास गुजरात आणि राजस्थानातून आलेल्या कलाकारांनी हे मंदिर सजवलंय. या ऐतिहासिक क्षणानिमित्त एक चांदीचं नाणं आणि एक स्टॅम्प बनवण्यात आलाय. दोनशे वर्ष पूर्ण होत असल्यानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळं दर्शनासाठी आणि या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातले जैन धर्मगुरु आणि भाविक इथं दाखल झालेत.
 
मुंबईतलं हे पहिलं जैन मंदिर असल्याचं सांगण्यात येतं. मंदिरातली मूर्ती साडेनऊशे वर्ष जुनी आहे. ही मूर्ती राजस्थानातून इथं आणण्यात आली. हा द्विशताब्दी सोहळा 18 दिवस चालणार आहे. त्यामुळं इथं येणा-या भाविकांच्या खाण्याची सोय आयोजकांकडून करण्यात आली. सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी भव्य मिरवणूकही काढण्यात येणार आहे.

First Published: Friday, April 27, 2012, 22:04


comments powered by Disqus