Last Updated: Saturday, April 28, 2012, 12:33
www.24taas.com,मुंबई मुंबईतल्या अंधेरी परिसरातल्या लोखंडवाला भागात तर्र झालेल्या एका मॉडेलने धुंदीत चार गाड्यांना धडक दिली. पुन्हा एकदा श्रीमंतीचा माज मुंबईत दिसून आला. मुंबईत नशेत गाड्या चालवून सामान्यांना त्रास देण्याचा उद्योग कमी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
एका एसएसएक्स चार गाडीनं तीन कार्सना टक्कर दिली. यात तीन जण जखमी झालेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मॉडेल अपर्णा शर्माची ही कार ताशी १०० किमीच्या वेगानं जात होती. याच वेगामुळे गाडीवरचा तिचा ताबा सुटला आणि दोन फूट भिंत ओलांडून एक रिक्षा आणि बाईकला धडक दिली. गाडीचा वेग कायम असल्याने एका डोंडा सिटी गाडीलाही टक्कर बसली. या घटनेनंतर पोलिसांनी मॉडेलला ताब्यात घेतलं असून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
First Published: Saturday, April 28, 2012, 12:33