सोन्याची ३० हजाराकडे झेप - Marathi News 24taas.com

सोन्याची ३० हजाराकडे झेप

www.24taas.com, मुंबई
 
सोन्याला नवी उच्चांकी झळाळी मिळालीय. सोन्याचा दर २९ हजार ९००रुपयांवर गेलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानं सोन्याच्या दरात ही वाढ झालीय. देशाचे सर्वाधिक परकीय चलन इंधन आयातीनंतर सोन्याच्या खरेदीवर खर्च होतंय.
 
सोन्यासह चांदीनेही १०० रुपये वाढीसह ५६ हजार ५०० रुपये किलोचा टप्पा पार केला.
 
अलिकडच्या काही दिवसांत डॉलर मजबूत होत असल्यानं सोन्याची आयात महाग होऊन त्याचा परिणाम दरावर होत आहे. ऐन लग्नसराईत सोनं महागलं असलं तरी ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी दिसून येतेय.

First Published: Sunday, April 29, 2012, 09:45


comments powered by Disqus