Last Updated: Sunday, April 29, 2012, 12:20
www.24taas.com, मुंबई 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 'कार्टून वॉच' या व्यंगचित्रकलेला वाहिलेल्या मासिकाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईत मातोश्री या निवासस्थानी आज या पुरस्कारानं शिवसेनाप्रमुखांचा सन्मान करण्यात येणार आहे.
'कार्टून वॉच' हे रायपूरमधून प्रसिद्ध होणारं मासिक आहे. याआधी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण, आबिद सुरती, अजित नैनन आणि प्राण यांना गौरवलं आहे. बाळासाहेबांची खरी ओळख म्हणजे एक सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार अशीच आहे.
बाळासाहेबांनी हि गोष्ट वारंवार स्पष्ट केली आहे. की, व्यंगचित्र ही त्यांची खरी आवड आहे. त्यामुळे खऱ्य़ा अर्थाने बाळासाहेंबाच्या व्यंगचित्रकलेला दाद देण्यात आली आहे.
First Published: Sunday, April 29, 2012, 12:20