'ऑडी' गाडीने चार जणांना उडवलं - Marathi News 24taas.com

'ऑडी' गाडीने चार जणांना उडवलं

www.24taas.com, मुंबई
 
विलेपार्लेमध्ये मध्यरात्री गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडीनं चार रिक्षाचालकांना उडवलं. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत. ऑडी गाडीने चार रिक्षाचालकांना उडवल्या ते गंभीर जखमी झाले आहेत.
 
ऑडी गाडी दोनच्या सुमारास अतिशय वेगानं धावत होती. मात्र चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडीनं चार रिक्षांना धडक दिली. जखमी रिक्षाचालकांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
विजय पटेल असं गाडीचालकाचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उच्चभ्रू वर्गातील कारचालकाने सामान्यांना गाडीने उडविल्याच्या घटनेत भर पडली आहे.
 
 
 

First Published: Sunday, April 29, 2012, 12:43


comments powered by Disqus