Last Updated: Saturday, November 26, 2011, 14:14
झी २४ तास वेब टीम, मुंबई आपल्या देशाची सुरक्षाव्यवस्था सदोष असून दहशतवादी हल्ल्यानंतरही त्यामध्ये सुधारणा झाली नसल्याचं मत शहिद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी व्यक्त केलंय. मुंबई काँग्रेसनं २६/११ च्या हल्ल्यात शहिद झालेल्या पोलिसांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात कविता करकरेंनी देशाच्या सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली. देशासाठी शहिद झालेल्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही असा उद्विग्न सवालही त्यांनी उपस्थित केला.
First Published: Saturday, November 26, 2011, 14:14