Last Updated: Monday, April 30, 2012, 09:53
www.24taas.com, मुंबई मुंबईत छमछम सुरू असल्याचे दिसून येत आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी यांनी बारमध्ये छमछम चालणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु आजही राजरोज बास सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या खार भागात मॅडनेस डिस्को पब आणि बारवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी १६ मुली आणि १२ जणांना अटक करण्यात आली.
या पबमध्ये अनैतिक धंदे चालत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली त्यावरून कारवाई करण्यात आली. पबमध्ये बाहेरून मुली आणून वेश्याव्यवसाय केला जात असल्याचा संशय होता. त्यावरून बोगस गि-हाईक पाठवून पोलिसांनी ही कारवाई केली. याचवेळी पबमधून हजारो रुपये जप्त करण्यात आले. मुंबईत खुलेआम बार सुरू असले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बारमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
First Published: Monday, April 30, 2012, 09:53