'आदर्श'ची जमीन लष्कराचीच- जन. सिंग - Marathi News 24taas.com

'आदर्श'ची जमीन लष्कराचीच- जन. सिंग

www.24taas.com, मुंबई
 
आदर्शच्या जमिनीच्या मालकीवरून पुन्हा वाद सुरु होण्याची चिन्ह आहेत. आदर्शची जमीन ही सेनेच्याच मालकीची असल्याचा दावा लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी केलाय.
 
न्यायालयीन आयोगाचा रिपोर्ट हा कोर्टाचा निकाल नव्हे त्यामुळे आम्हाला तो मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. न्यायालयीन आयोगानं आपल्या अहवालात आदर्शची जमीन राज्य सरकारची असून ती आरक्षित नसल्याचं नमूद केलं होतं. त्यावर व्ही. के. सिंह यांनी आपलं मत मांडलंय.
 
तसंच, आदर्श सोसायटीप्रकऱणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडी अशोक चव्हाणांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. सदनिका घेताना सदनिका खरेदीसाठी पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
 
 

First Published: Tuesday, May 1, 2012, 09:01


comments powered by Disqus