राणेंना धक्का, जयवंत परब सेनेत - Marathi News 24taas.com

राणेंना धक्का, जयवंत परब सेनेत

झी 24 तास वेब टीम, मुंबई
 
नारायण राणेंचे कटर समर्थक जयवंत परब पुन्हा माघारी परतले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
 
कामगार संघटनांमध्ये दबदबा असलेले परब यांनी कॉंग्रेसला सोडून सेनेचा रस्ताधरल्याने तो राणेंसाठी मोठा धक्का आहे. यापूर्वी माजी आमदार श्रीकांत सरमऴकर कॉंग्रेसला सोडून पुन्हा सेनेत आलेत. त्यामुळे राणेंचा एकेक सहकारी स्वग़ही परतत असल्यानं शिवसेना मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार तयारी करत असल्याचं दिसत आहे.

First Published: Sunday, November 27, 2011, 09:28


comments powered by Disqus