गडकरी-मुंडे भेटीचा योग पुन्हा टळला - Marathi News 24taas.com

गडकरी-मुंडे भेटीचा योग पुन्हा टळला

झी 24 तास वेब टीम, मुंबई


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि खासदार गोपीनाथ मुंडे मुंबईत एकत्र येण्याचा योग पुन्हा एकदा टळलाय.
 
मुंबईतल्या नगरसेवक कार्य अहवाल प्रकाश सोहळ्यानिमित्त दोन्ही नेते एकत्र येणार होते. मात्र गडकरींनी या कार्यक्रमाला दांडी मारली. गडकरींची तब्येत ठीक नसल्यानं ते अनुपस्थित राहिल्याचं कारण सांगण्यात येतय. गडकरींनी फोन करून तब्येत ठीक नसल्याचा निरोप देऊन आपल्याला भाषण करायला सांगितलं असंही मुंडेंनी यावेळी सांगितलं.
 
नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेदरम्यान हे दोन्ही नेते एकत्र आले होतो. मात्र त्यांच्या मुंबईतील भेटीचा योग आज पुन्हा टळलाय.

First Published: Sunday, November 27, 2011, 10:08


comments powered by Disqus