Last Updated: Tuesday, May 1, 2012, 20:01
www.24taas.com, मुंबई 
महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायद्याला राज्यातील कामगार संघटनानी विरोध केलाआहे. हा कायदा रद्द करावा यासाठी ३२ कामगार संघटनानी राज्यपालाना निवेदन केल होतं.
यावर राज्यापालानी ठोस आश्वासन न दिल्यामुळे हिंद मजदूर सभेशी संलग्न असलेल्या कामगार संघटनानी कामगार दिनी काळा दिवस साजरा केला. हा काळा दिवस साजरा करताना रेल्वे,डॉक,बेस्ट उपक्रमासह महापालिकेच्या कामगारांनी कार्यालयाच्या बाहेर काळे झेंडे दाखवत निर्दशन केली.
या कामगार कायद्या विरोधातील निर्दशने ही कामगार दिनी करण्यातच आली आहे. त्यामुळे कामगारदिनी कामगारांनी काळे झेंडे दाखवून काळा दिवस साजरा केल्याने आता तरी हा कायदा रद्द होणार का? हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे...
First Published: Tuesday, May 1, 2012, 20:01