Last Updated: Sunday, November 27, 2011, 13:06
झी 24 तास वेब टीम, विरार 
विरारमध्ये वज्रेश्वरी रोड येथील वस्तीमध्ये बिबट्या घुसला. त्याने या मानवी वस्तीमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराटीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात एका मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे तर एक लहान मुलगा जखमी झाला आहे.
विरारमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 14 वर्षीय मुलगी ठार झाली. तर 10 वर्षीय मुलगा जखमी झाला. वंदना पिंगळे असं मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. बिबट्यानं 2 ठिकाणच्या मानवी वस्तीवर हल्ले केले.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अजूनही येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
तर दुसरीकडे मुंबईतील मीरारोड येथील काशिमिरा भागात सुद्धा बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यात एकाला आपला जीव गमवावा लागला. दिवसभरातील बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले यात दोन जणांचा बळी गेला आहे.
First Published: Sunday, November 27, 2011, 13:06