इमारतीचा भाग कोसळला, एकजण ठार - Marathi News 24taas.com

इमारतीचा भाग कोसळला, एकजण ठार

www.24taas.com, मुंबई
 
भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळून एक मजूर ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. पुनर्विकासासाठी ही इमारत पाडली जात होती. सुमारे शंभर वर्ष जुन्या असलेल्या लक्ष्मी बिल्डींगच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलं होतं.
 
मात्र हे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. नेमकी कुणाच्या चुकीमुळे मजुराला प्राण गमवावा लागला याचा आता तपास घेतला जातो आहे. तसंच भविष्यात या ठिकाणी पुन्हा अशी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन संबंधितांना प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
 
मुंबईत अशा अनेक धोकादायक इमारती आहेत. पण अजूनही नागरिक त्यात वास्तव्य करतात, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. मात्र अनेक वेळेस प्रशासनाच्या उदासिनतेमुळे असे प्रकारही घडतात.
 
 
 

First Published: Wednesday, May 2, 2012, 15:06


comments powered by Disqus