सरपंचांसाठी विधानपरिषदेचे दरवाजे बंद - Marathi News 24taas.com

सरपंचांसाठी विधानपरिषदेचे दरवाजे बंद

www.24taas.com, मुंबई
 
सरपंचांना विधान परिषेदेचे दरवाजे बंद झाले आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करुन त्याऐवजी १४ सरपंचांना विधान परिषेदत संधी द्यावी, असा केंद्राचा प्रस्ताव होता.
 
मात्र राज्य मंत्रिमंडळानं हा प्रस्ताव फेटाळला आहे. या प्रस्तावानुसार १४ सरपंचांना आमदारकीची संधी मिळाली असती. या प्रस्तावाच्या अभ्यासासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमितीही स्थापन केली होती.
 
तसचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरंपच मेळाव्यात सरपंचांतून आमदार व्हावेत, ही भूमिका मांडली होती. मात्र मंत्रिमंडळाच्या या निर्णयानं पवारांच्या भूमिकेला छेद दिला आहे. एवढचं नाही तर राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनीही शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करण्यास विरोध दर्शवला आहे.
 
 
 

First Published: Wednesday, May 2, 2012, 18:56


comments powered by Disqus