Last Updated: Thursday, May 3, 2012, 13:52
www.24taas.com, मुंबई माहीम बस थांब्यावर विजेचा धक्का बसल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. बुधवारी रात्री तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
माहीम बस थांब्यावर विजेचा जोरदार धक्का बसलेल्या तरुणाचे नाव अद्याप समजलेले नाही. बस थांब्यावर लागलेल्या जाहिरातीच्या फलकात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे तरुणाला विजेचा धक्का बसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविलेला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून जाहिरात कंपनीला दोषी ठरविण्यात आल्याचे वृत्त आहे.
व्हिडिओ पाहा..
First Published: Thursday, May 3, 2012, 13:52