'राज ठाकरे परदेशात जातात त्याचं काय'? - Marathi News 24taas.com

'राज ठाकरे परदेशात जातात त्याचं काय'?

www.24taas.com, मुंबई
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आमदारांच्या परदेश दौऱ्याला विरोध केल्यानं राजकारणही तापलं आहे. राज स्वतः परदेशात जात नाहीत काय असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे. दुष्काळ नसलेल्या भागातील आमदार दौऱ्यावर गेले तर बिघडलं कुठं असा सवाल माणिकरावांनी केला आहे.
 
महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असताना आपले मंत्री परदेशी दौरे करण्यात मग्न आहेत’. ‘अशा मंत्र्यांना आपल्या जिल्ह्यात येऊ देऊ नका’, ‘जिल्हाबंदी करा अशा मंत्र्यांना’. असं काल राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांनी सरकारमधील मंत्र्यांवर सरळ सरळ निशाणा साधला होता.
 
‘हे आमदार परदेशी जाऊन कसले अभ्यास दौरे करतात’ ? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला होता. ‘तर परदेशवारी करणाऱ्या मंत्र्यांना जिल्हाबंदी करा’, असं आ्वाहन त्यांनी जनतेला केलं होतं.
 
 
 

First Published: Thursday, May 3, 2012, 17:38


comments powered by Disqus