मुंबईत अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार - Marathi News 24taas.com

मुंबईत अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतल्या एलटी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार झालाय. गोळीबार करणा-या एकाला अटक करण्यात आली असली तरी तिघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरलेत. पपनसवाडी परिसरात ही घटना घडलीय. चोरीच्या उद्देशानं ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे..
 
चार लोकांनी एका नागरिकावर गोळीबार केला आणि पळायला लागले. आरडाओरडा ऐकू आल्यावर स्थानिक नागरिकांनी तसंच तेथील दुकानदारांनी मिळून चार हल्लेखोरांपैकी एकाला पकडलं आहे. एलटी मार्ग पोलिसांनी या पकडल्या गेलेल्या हल्लेखोराला अटक केली आहे.
 
हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, हे अजून स्पष्ट झालेली नाही. पोलीस याबद्दल चौकशी करत आहेत. या हल्ल्यात नेमके कितीजण जखमी झाले आहेत, हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही.

First Published: Thursday, May 3, 2012, 18:52


comments powered by Disqus