भरा म्हाडाचा अर्ज - Marathi News 24taas.com

भरा म्हाडाचा अर्ज


www.24taas.com, मुंबई
 
म्हाडाने मुंबई आणि कोकण मंडळाअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घरांसाठीचे अर्ज भरण्यासाठी जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईटवर अर्जदारांच्या उड्या पडल्यानं वेबसाईट हँग झाली होती. दोन दिवस वेबसाईट हँग असल्यानं अनेकांना अर्ज भरता आले नाहीत.
 
अखेर म्हाडानं पर्याय म्हणून URL| www.mhada.org ही वेबसाईट सुरू केली आहे. आधीची वेबसाईट असल्यानं म्हाडाच्या कार्यालयातले फोन गेले दोन दिवस सारखे खणखणत होते. अर्जदारांना झालेल्या मनस्तापाबद्दल म्हाडानं दिलगिरी व्यक्त केली आहे.
 

 म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी इथं क्लिक करा


 
 
दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालीय. पर्यायी वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदारांना दिलासा दिलाय. ऑनलाईन अर्जांसाठी देण्यात आलेली वेबसाईट सुरू करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत प्रयत्न सुरू असून ही वेबसाईटही लवकरच सुरू होईल असं म्हाडातर्फे सांगण्यात येतंय.
 
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 15:22


comments powered by Disqus