वरळी-हाजीअली सी-लिंक रद्द - Marathi News 24taas.com

वरळी-हाजीअली सी-लिंक रद्द

www.24taas.com, मुंबई
बहुचर्चित वरळी- हाजीअली सी-लिंक हा ५००० कोटी रुपयांचा महत्वकांक्षी प्रकल्प सुरु होण्याआधीच रद्द होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिलेत. मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर हे उद्या दिल्लीत कोस्टल रोडसंदर्भातल्या पर्यावरणाच्या परवानगीसाठी संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत.
 
उत्तर-दक्षिण मुंबई जोडणारा ३५ किमी लांबीचा आणि १०,००० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प एक स्वस्त आणि जलद वाहतूकीचा पर्याय म्हणून ओळखला जात आहे. हा प्रकल्प झाला तर वरळी - हाजी अली सी लिंक हा पांढरा हत्ती ठरणार आहे.
 
तसंच कोस्टल रोडला राज्य सरकार प्राधान्य देत असून रिलायन्स इन्फ्राच्या वरळी- हाजीअली सी लिंक प्रकल्पाची जवाबदारी सरकार घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे हा प्रकल्प रद्द होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
 

First Published: Monday, May 7, 2012, 23:28


comments powered by Disqus