Last Updated: Tuesday, November 29, 2011, 10:00
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
एकीकडे डोंबिवलीत लागोपाठ दरोडे पडले तर काल रात्री मुंबईच्या झवेरी बाजारात 50 लाखांचा दागिन्यांचा चोरीने एकच खळबळ उडाली. मातोश्री जेल्वर्सच्या दुकानात रात्रीच्या वेळी ही चोरी करण्यात आली. त्यामुळे पोलिसांवर सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. डोंबिवलीत पोलीस रात्री पोलीस स्टेशनमध्ये चक्क झोपा काढतात. त्यामुळे आता पोलीस खात्यावर चांगलाच दबाव येत आहे.
या ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या देवराज मिश्रा नावाच्या या वॉचमननं चोरी केली. वॉचमन मिश्रा यानं दुसऱ्या वॉचमनला गुंगीचं औषध देऊन ५० लाखांचे दागिने लंपास केले. वॉचमन मिश्रा फरार असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
First Published: Tuesday, November 29, 2011, 10:00