यासिन भटकळची मुंबईत लाखोंची गुंतवणूक - Marathi News 24taas.com

यासिन भटकळची मुंबईत लाखोंची गुंतवणूक

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई बॉम्बस्फोटांतला मुख्य आरोपी असलेल्या यासीन भटकळची मुंबईत गुंतवणूक असल्याचं उघ़ड झालं आहे. दहशतवादी यासीन भटकळची मुंबईत गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.
 
यासिन भटकळ मोस्ट वाँण्टेड गुन्हेगार आहे. भारतातील अनेक बॉम्बस्फोटमधील प्रमुख गुन्हेगार म्हणून तो भारताला हवा आहे. यासिनने मात्र रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचे उघड  झाले आहे. नालासोपाऱ्यातील 'पूनम पॅराडाईज'मध्ये १४ लाखांची गुंतवणूक केली आहे.
 
अटकेत असेलल्या नकीमार्फत यासीनचा व्यवसाय सुरू आहे. यासीन मुंबई बॉम्बस्फोटांतील मुख्य आरोपी आहे. एटीएस प्रमुख राकेश मारियांचा या वृत्ताला दुजोरा  देखील मिळाला आहे. मोस्ट वॉण्टेड यासीन भटकळचा पैसा मुंबईत गुतंवला गेला आहे. आणि रियल इस्टेटचा बिझनेस म्हणून त्याने ही गुंतवणूक  केली आहे.
 
 
 

First Published: Thursday, May 10, 2012, 12:16


comments powered by Disqus