अरे बापरे! आता मालमत्ता करातही वाढ - Marathi News 24taas.com

अरे बापरे! आता मालमत्ता करातही वाढ

www.24taas.com, मुंबई 

 
मुंबईत आता नवीन मालमत्ता कर लागू होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला असून तो लवकरच मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईत आता रेडी रेकनरच्या दरानुसार मालमत्ता कर भरावा लागणार आहे.
 
 
केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार असलेल्या या कराला सर्वपक्षीय नगरसेवकांचा आधी विरोध होता. मात्र आता विरोध मावळल्यानं मुंबईकरांना आता या कराला सामोरं जावं लागणार आहे.
 
केंद्र आणि राज्य सरकारच्या बजेटनंतर महागाई जी सुरू झाली ती थांबायचं नाव घेत नाहीय. हे कमी की काय, म्हणून महापालिकेनंही त्यामध्ये भर घातलीय. मालमत्ता कराबरोबरच, पाणीपटीमध्ये आठ टक्के वाढ होणार आहे. तसंच फायर टॅक्सही प्रस्तावित आहे. त्यातच रिक्षा, टॅक्सी आणि बेस्ट दरवाढीनं मुंबईकरांचं पुरतं कंबरडं मोडलंय.
 
मुंबईत घरांचं स्वप्न पाहणा-यांसाठी म्हाडा म्हणजे आशेचा किरण होता, पण म्हाडाची घरंही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यायत. घराबरोबरच मुंबईकरांचं किचन बजेटही पुरतं कोलमडलंय. स्वयंपाकाच्या गॅससह दुष्काळामुळे भाज्याही महागल्यायत. त्यामुळे महागाईच्या या काळात मुंबईकरांनी जगायचं कसं, हा प्रश्न सतावतोय.

First Published: Thursday, May 10, 2012, 16:36


comments powered by Disqus