घाटकोपरमध्ये भिंत आणि छप्पर फोडून चोरी - Marathi News 24taas.com

घाटकोपरमध्ये भिंत आणि छप्पर फोडून चोरी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
घाटकोपर भागात भिंत आणि छप्पर फोडून चोरी करणाऱ्या टोळीने खळबळ उडवून दिली आहे. केवळ २४ तासांत  चार ठिकाणी डल्ला मारण्यात आलाय.विशेष म्हणजे एकाच परिसरातल्या चार दुकानांना लक्ष्य कऱण्यात आलंय. चारही दुकानात चोरी कऱण्यासाठी एकाच पध्दतीचा अवलंब कऱण्यात आला आहे. त्यामुळे त्याच परिसरातल्या एखाद्याचा यामध्ये हात असावा असा संशय व्यक्त केला जातोय.
 
सराफाच्या दुकानाची भिंत तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घाटकोपर परिसरातील या सराफाच्या दुकानात काही अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास छतालगतची भिंत तोडून दुकानात प्रवेश मिळवला. दुकानात प्रवेश मिळवून चोरट्य़ांनी दुकानातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंची चोरी केली. घाटकोपर परिसरातील ज्या सराफाच्या दुकानात चोरट्यांनी ही चोरी केली, त्या परिसरातील सराफाच्या दुकानालगतच्या आणखी दोन सराफ आणि हार्डवेअरच्या दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी या तिनही दुकानात एकाच पध्दतीने भिंत फोडून चोरी केल्यान परिसरात दहशतीच वातावरण आहे..

 
चोरांनी कधी भिंत तर कधी छप्पर फोडून डाव साधला. त्यामुळं चोरट्यांना चोरीकरण्यासाठी याच परिसरातील एखाद्या साथीदारांनी मदत केल्याचा संशय व्यक्त करणयात येत आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 

First Published: Tuesday, November 29, 2011, 14:09


comments powered by Disqus