Last Updated: Saturday, May 12, 2012, 00:05
www.24taas.com, मुंबई दुष्काळग्रस्तांना मदत आणि कोरडे सिंचन यावरून आघाडीत सुरु झालेल्या वादात काँग्रेसनं आज आणखी आक्रमकपणे राष्ट्रवादीवर हल्ला चढवला आहे. सोनिया गांधींकडे मदत मागितल्याची टीका करणाऱ्या राष्ट्रवादीला आज काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी खरमरीत उत्तर दिलं.
दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र आणि सोनिया गांधींकडे मदत मागायची नाही तर काय आयपीएलकडून मागायची का ? अशी बोचरी टीका मोहन प्रकाश यांनी मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात केली. तर मुख्यमंत्र्यांनीही आज अजित पवार यांना पुन्हा सिंचनावरून टार्गेट केलं.
सिंचनाच्या कामांत चुका झाल्या हे मान्य करून परीक्षण करावंच लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना फटकारलं. त्यातच मुख्यमंत्र्यांना प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट देत मोहन प्रकाश यांनी राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले.
First Published: Saturday, May 12, 2012, 00:05