Last Updated: Saturday, May 12, 2012, 11:20
www.24taas.com, मुंबई मुंबईतल्या खेतवाडी भागात भरधाव बाईक चालवून स्टंट्स करणा-या तरूणांना आपली स्टंटगिरी चांगलीच महागात पडली. संतप्त नागरिकांनी चोप देऊन बाईकची होळी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून खेतवाडीत भरधाव बाईक चालवून काही तरूण स्थानिकांना त्रास देत होते. त्यांना अनेकदा समजावूनही त्यांचे बाईकस्टंट थांबले नाहीत. अखेर संतप्त नागरिकांनी काल रात्री या तरूणांची चांगलीच धुलाई केली.
एव्हढ्यावरच न थांबता स्थानिकांनी त्यांच्या बाईक्सचीही तोडफोड केली. तर एक बाईक जाळण्यात आली. नागरिकांचा संताप पाहून बाईकस्वारांनी तिथून पळ काढला. अखेर नागरिकांची समजूत काढून पोलिसांनी हे प्रकरण मिटवलं. गेल्या अनेक दिवसांपासून खेतवाडीत बाईकस्वारांनी उच्छाद मांडला होता. त्यांच्या भरधाव बाईक चालवण्यामुळे नागरिक त्रस्त झाले होत. त्यामुळेच हे पाऊल उचलावं लागलं असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
First Published: Saturday, May 12, 2012, 11:20