जयराम यांच्या तोडाचे शौचालय - बाळासाहेब, Thackeray to Jairam Ramesh: Why attack temples in toilet comment?

जयराम यांच्या तोंडाचे शौचालय - बाळासाहेब

जयराम यांच्या तोंडाचे शौचालय - बाळासाहेब

देशाला मंदिरांची नाही शौचालयांची गरज आहे, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय ग्रामीण मंत्री जयराम रमेश यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. देशात शौचालयांची कमतरतेला काँग्रेस जबाबदार असल्याचेही बाळासाहेबांनी म्हटले आहे.

देशातील दोन तृतांश जनता अजूनही उघड्यावर शौच करतात, ही हैराण करणारी गोष्ट आहे. देशाला स्वातंत्र मिळवून ६५ वर्ष झाले आहेत. यात अधिकाधिक वर्ष काँग्रेसचे शासन होते. त्यामुळे देशात शौचालयांची कमरता असल्याने ती काँग्रेसची जबाबदारी आहे. सामाजिक समस्या दूर करण्यात काँग्रेस कमी पडले असल्याची टीकाही बाळासाहेबांनी यावेळी केले.

मंदिरांची निर्मिती ही व्यक्ती स्वेच्छेने करतात आणि त्यासाठी आपली साधन संपत्ती वापरतात. परंतु, शौचालयांची जबाबदारी ही सरकारची आहे. त्यात सरकार कमी पडली आहे.

जयराम रमेश यांनी मंदिरांऐवजी मशीद किंवा मदरसा किंवा चर्चचा उल्लेख का केला नाही, असा खडा सवालही बाळासाहेबांनी केला आहे. केवळ मंदिरांना लक्ष्य करण्याची काय गरज होती. जयराम रमेश यांनी मशीदीचं नाव घेतलं असतं तर मुस्लिम मौलवी सलमान रश्दीविरोधात जसा फतवा जारी केला, त्याच प्रकाराचा फतवा रमेश याच्यावर जारी केला असता. तसेच त्यांनी चर्चचे नाव घेतले असते, तर रोममधून पोप यांनी नाराजी व्यक्त केली असती किंवा सोनिया गांधी यांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला असता, असेही खडेबोल सुनावले आहेत.

First Published: Monday, October 8, 2012, 17:29


comments powered by Disqus