Last Updated: Monday, May 5, 2014, 08:13
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईतब्बल आठ वर्षांची प्रतिक्षा आणि विविध चाचण्यांनंतर अखेर मुंबई मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मात्र मेट्रोच्या या प्रवासासाठी मुंबईकरांना नियोजित भाड्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो हा भारतातला पहिला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असलेला प्रकल्प आहे. 2006 झालेल्या करारानुसार बेस्टच्या दीडपट भाडे आकारण्यात येणार होते. मात्र आता मेट्रोकडून नियमांचा आधार घेत जादा प्रवासी भाडे आकारण्याची मागणी होतेय.
कमीत कमी भाडे नऊऐवजी 22 रुपये करण्याचा घाट घातला जातोय. याला विरोध करत काँग्रेस नगरसेवक प्रविण छेडा यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिलं. या भाडेवाढीच्या प्रस्तावावर मुंबईकरांनीही नाराजी व्यक्त केलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 5, 2014, 08:13