टोल नाके बंदचा निर्णय हे मनसेचे यश, The decision to close down the toll MNS success - Pravin darekar

टोल नाके बंदचा निर्णय हे मनसेचे यश - दरेकर

टोल नाके बंदचा निर्णय हे मनसेचे यश - दरेकर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्य सरकारच्या टोल नाके बंद करण्याच्या निर्णय हे मनसेच्या आंदोलनाचं यश आहे, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार प्रविण दरेकर यांनी दिलीय.. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं म्हटलंय.

टोलनाके बंद करण्याच्या निर्णयानंतर देर आए, दुरुस्त आए, अशी प्रतिक्रिया दिलीय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. झी २४ तासवर त्यांनी सर्वप्रथम ही प्रतिक्रिया दिलीय. राज्यातले ४४ टोलनाके बंद होणार आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देणारी बाब आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आज एलबीटीबाबत महत्वाची बैठक घेणार आहेत. ज्या शहरात एलबीटी सुरु आहे. तिथल्या पर्यायी आर्थिक स्त्रोतांबाबत चर्चा होईल. एलबीटी रद्द करण्याबाबत गेले अनेक दिवस राज्यात व्यापा-यांचे आंदोलन सुरु आहे. टोलबाबत महत्वाचा निर्णय घेतल्यावर आता एलबीटी रद्द होण्याबाबत सरकारकडून संकेत मिळत आहेत.

राज्यातले ४४ टोलनाके बंद होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, याची घोषणा विधानसभेत केलीय. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३४ जणांचा तर एमएसआरडीच्या १० टोलनाक्यांचा समावेश आहे... राज्यात एकूण १६६ टोलनाके आहेत, त्यातले ४४ टोलनाके बंद होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीच्या टोलनाक्यांवर यापुढे एसटीला टोल बसणार नाही. यामुळे राज्यावर ३०६ कोटींचा बोजा पडणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 10, 2014, 08:05


comments powered by Disqus