मुंबईत पोलीस भरतीचा पाचवा बळी, The fifth death in Mumbai Police Recruitment

मुंबईत पोलीस भरतीचा पाचवा बळी

मुंबईत पोलीस भरतीचा पाचवा बळी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पोलीस भरती प्रक्रियेत आणखी एका उमेदवाराचा मृत्यू. झालाय. गहनीनाथ लटपटे असं त्याचं नाव आहे. बीडचा रहिवाशी असलेला गहनीनाथ 14 तारखेला विक्रोळीमध्ये भरती प्रक्रिया सुरु असताना बेशुद्ध पडला होता. त्याचं मंगळवारी रात्री मुलुंडच्या प्लॅटिनम रुग्णालयात निधन झालं.

पोलीस भरती प्रक्रीया दरम्यान झालेला हा पाचवा मृत्यू आहे. गहनीनाथचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पोलिसांना सोपवण्यात आला असून त्यानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.

गहिनाथ हा पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेला. त्याच वेळी तो चक्कर येऊन पडला होता. त्यात तो जखमीही झाला होता. त्यानंतर त्याला प्लॅटिनम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते.

यापूर्वी, मालवणचा अंबादास सोनावणे, विरारचा प्रसाद माळी, नाशिकचा विशाल केदारे, राहुल सपकाळ या चौघा तरुण उमेदवारांचा मृत्यू झाला आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 07:55


comments powered by Disqus