मुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे राहणार बंद, The main runway of Mumbai Airport will be closed for 7 Months

मुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे राहणार बंद

मुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे राहणार बंद
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

ऑक्टोबर महिन्यापासून मुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे बंद राहणार आहे. बांधकामासाठी हा रनवे बंद ठेवण्यात येणार असून ऑक्टोबरपासून पुढील सात महिने म्हणजेच मे 2014 पर्यंत मुख्य रनवे बंद राहणार आहे.

ऑक्टोबरपासून हा रनवे रोज आठ तास बंद राहणार आहे. दोन नवीन टॅक्सीवेच्या बांधकामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीवर याचा फारसा परिमाण होणार नसला तरी डोमेस्टिक रुटवर उशीर, तिकीटाला जास्त पैसे आणि शेड्यूलमध्ये मोठे बदल होणे अपेक्षित आहेत.

त्यामुळं याकाळात हवाई वाहतूक करणाऱ्यांना याचा थोडाफार त्रास सहन करण्याची तयारी करुनच घरुन निघावं लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 21, 2013, 15:56


comments powered by Disqus