Last Updated: Monday, February 4, 2013, 12:51
www.24taas.com,मुंबईमुंबईतल्या हिट एन्ड रनची घटना घडलीये. एका भरधाव बाईकस्वाराने दोन पोलिसांना उडवलयं. पहाटेच्या सुमारास नाकाबंदीच्या वेळी ही घटना घडलीये.
घाटकोपरच्या लोकमान्य टिळक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस नाकाबंदीवर होते. त्यावेळी एका भरधाव बाईकस्वाराला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र बाईकस्वाराने बाईक थांबवण्याऐवजी ती पोलिसांच्या अंगावर घातली.
यामध्ये हवालदार यशवंत कदम आणि चंद्रकांत गोरे जखमी झालेत. तर बाईकस्वार बाईक टाकून घटनास्थळाहून फरार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
First Published: Monday, February 4, 2013, 12:05