`मौलाना` ही उपाधी चालते का?- राऊत, Then why Maulana title is ok?- Raut

`मौलाना` ही उपाधी चालते का?- राऊत

`मौलाना` ही उपाधी चालते का?- राऊत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

“देशात अनेक शासकीय संस्थांना मुस्लिम नेत्यांची नावं आहेत आणि त्यात असलेली मौलाना ही उपाधी कशी चालते?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. जोगेश्वरीतल्या ट्रॉमा सेंटरला दिलेल्या नावामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद रंगलाय.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या नावातल्या हिंदूहृदयसम्राद शब्दाला राष्ट्रवादीनं आक्षेप घेतलाय. हा शिवसेनेचा राजकीय अजेंडा असल्यामुळे त्यासाठी जनतेच्या पैशाचा वापर चुकीचा नवाब मलीक यांनी म्हटलं होतं. त्याला आज शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय.

जोगेश्वरी येथे जे ट्रॉमा केअर रुग्णालय उभारले आहे, त्यात डॉक्टर नाहीत, इतर स्टाफ नेमला नाही आणि मशीनही नाहीत. त्यामुळे या रुग्णालयचा फायदा रुग्णांना होणे दूरच राहिले आहे. मात्र, या रुग्णालयाच्या माध्यमातून शिवसेना आपला राजकीय अजेंडा राबवत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला.

कांदिवली येथील क्रीडा संकुलाला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याला शिवसेनेने विरोध केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केलाय. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी या संकुलाला सचिनचे नाव न देता लिटील मास्टर सुनील गावस्कर यांचे नाव देण्याचे पत्र एमसीएला दिले आहे. ते एमसीएचे सदस्य आहेत.

शिवसेनेला टार्गेटकरून राष्ट्रवादीने आपला रोख काँग्रेसकडून वळवल्याचे दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते पवार यांनी काँग्रेसबाबत टीका करताना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच राष्ट्रवादी शिवसेनेकडे वळल्याचे दिसत आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, October 26, 2013, 15:49


comments powered by Disqus