Last Updated: Tuesday, August 27, 2013, 09:03
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमुंबई महापालिका आयुक्तांनी संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याची दिलेली 25 ऑगस्टची डेडलाईन संपलीय. अजूनही अनेक रस्त्यांवर खड्डयांचं साम्राज्य दिसून येतंय. यामुळं गणेशमूर्ती मंडपात घेवून येताना गणेशोत्सव मंडळांना त्रास होतोय.
बृहनमुंबई सार्वजनिक गणेशोत्सोव समन्वय समितीनं यासंदर्भात महापालिकेकडं तक्रार केल्यानं यासंदर्भात महापालिकेत बैठक संपन्न झाली. यावेळी महापौरांनी खड्डे भरण्याचं काम सुरु असून गणेश आगमनापर्यंत सर्व खड्डे भरले जातील, असं आश्वासन दिलं. तर बीएमसीला खड्डे भरणं जमणार नसेल तर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ आपल्या निधीतून खड्डे भरून घेतील. असा इशारा समन्वय समितीनं दिला.
मात्र अजूनही मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळं महापालिकेचा दावा मात्र फोल ठरलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, August 27, 2013, 09:03