Last Updated: Thursday, November 29, 2012, 11:10
www.24taas.com, मुंबई अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर थर्मल सिक्युरिटी कॅमेरे बसविण्याचा निर्णय मुंबई महापालिकेन घेतलाय. हे कॅमेरे संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या, ७ तलाव आणि २३ जलाशय अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. जलवाहिन्यांना एकीकडे झोपड्डयांचा वाढता धोका लक्षात घेऊन ‘थर्मल सिक्युरिटी कॅमेरे’ बसविण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. हे थर्मल सिक्युरिटी कॅमेरे पाच किलोमीटर परिसरात नजर ठेवणार आहेत, अशी माहिती मुंबईचे महापौर सुनिल प्रभू यांनी दिलीय.
जलवाहिन्यांच्या जवळ कुणी संशयास्पद काही ठेवल्यास अलार्मही वाजण्याची सोय आहे. पालिकेनं त्यासाठी वीस कोटी खर्च केलेत. दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार पालिकेनं जलवाहिन्यांच्या भोवतालच्या झोपड्डयाही हटवायला सुरुवात केलीय.
First Published: Thursday, November 29, 2012, 09:12