पुढच्या पिढीला ‘वाघ’ दिसू द्या!, tiger day

पुढच्या पिढीला ‘वाघ’ दिसू द्या!

पुढच्या पिढीला ‘वाघ’ दिसू द्या!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आज जागतिक व्याघ्र दिवस... वाघांबद्दलची जनजागृतीसाठी २०१० पासून हा दिवस पाळला जातो. मात्र, ही जागृती केवळ एक दिवस करून भागणार नाही वर्षाचे १२ महिने प्रत्येकाने ही मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

याला कारण आहे दिवसांगणिक वाढत चाललेल्या वाघांच्या चोरट्या शिकारी आणि वाघांच्या आदिवासावर होणारं मानवाचं अतिक्रमण... आजही राज्यात तब्बल १५ टक्के वाघांची शिकार होत असल्याचं उघड झालंय. आंतरराष्ट्रीय टोळ्यांकडून महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या जंगलांत राजरोसपणे वाघांची शिकार सुरू असल्याच्या अनेक बातम्या उघड होत आहेत. एकट्या महाराष्ट्रातील सुमारे १० ते १५ टक्के वाघ शिकारींमुळे गतप्राण झाल्याची माहिती मिळतेय.

आपल्या भावी पिढीला हा रूबाबदार प्राणी दाखवायचा असेल तर व्याघ्रहत्या थांबवण्यासाठी कडक कायदे करणं आणि वाघांच्या आदिवासाचं संरक्षण करण्याची गरज आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 10:08


comments powered by Disqus