महाकवी नामदेव ढसाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार, Today Namdeo Dhasal on exequies

महाकवी नामदेव ढसाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार

महाकवी नामदेव ढसाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

साठोत्तरीतील मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ यांचं पार्थिव आज वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज प्रांगणात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहेत. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ढसाळ यांच्या पार्थिवावर दुपारनंतर दादर चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बुधवारी पहाटे बॉम्बे रुग्णालायत नामदेव ढसाळ यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने दलित साहित्यात मोठी पोकळी निर्माण झालीय.

दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे काल निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. ते आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 16, 2014, 11:46


comments powered by Disqus