Last Updated: Sunday, October 27, 2013, 12:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईरेल्वेमंत्री मलिल्कार्जुन खरगे आज एक दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी तब्बल ३ नवीन लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा शुभारंभ, नवीन लोकलचे उद्घाटन, रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी मोहिम असे अनेक जंगी कार्यक्रम आहेत.
गेल्या चार वर्षात देशानं तब्बल पाच रेल्वेमंत्री बघितले. मल्लिकार्जुन खरगे हे आता सहावे रेल्वेमंत्री. नवीन रेल्वेमंत्री आले की समस्यांचा पाढा पहिल्यापासून रेल्वेमंत्र्यांसमोर वाचावा लागतो. त्यामुळं मुंबईत पहिल्यांदाचा येणाऱ्या नवीन रेल्वेमंत्र्यांसमोर मुंबई आणि परिसरातील रेल्वे समस्या कशा मांडल्या जातात आणि याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
त्यातच निवडणुकांचा सिझन असल्यानं मात्र या निमित्तानं या नवीन रेल्वेमंत्र्यांकडून मुंबई आणि परिसरातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील अशा अपेक्षा व्यक्त होतेय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 27, 2013, 12:00