Last Updated: Thursday, January 30, 2014, 22:02
www.24taas.com, झी मीडिया, दिल्लीमनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात वाशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषण केल्य़ाचा आरोप ठेवण्यात आलाय.
२६ जानेवारीला नवी मुंबईतल्या भाषणात राज ठाकरेंनी टोलविरोधात भाष्य करताना तोडफोडीची भाषा केली होती. त्यानंतर लगेचच मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात टोलनाक्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर सरकारनं राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांच्याविरोधात पुण्यात राजगड आणि लोणी काळभोर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर वाशीत आज राज ठाकरेंवर तिसरा गुन्हा नोंदवण्यात आलाय. राज ठाकरेंवर पुण्यात राजगुरूनगर खेड पोलीसातही गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण चार गुन्हे राज यांच्याविरोधात दाखल झालेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 30, 2014, 22:02