टोल नाके बंद, मनसे इम्पॅक्ट नाही - भुजबळ, toll collection stop is not mns impact - bhujbal

टोल नाके बंद, मनसे इम्पॅक्ट नाही - भुजबळ

टोल नाके बंद, मनसे इम्पॅक्ट नाही - भुजबळ

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या बैठकीतल्या मागण्यांवर सरकारनं यापूर्वीच विचार केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. नव्यानं लागू करण्यात येणा-या टोल धोरणात या सर्व बांबीचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळं १० कोटींच्या आतले टोलनाके बंद करण्याचा निर्णयही जुनाच असल्याचं भुजबळांनी सांगितलंय. राज्य सरकारने यापूर्वीच काही टोल बंद करायचं ठरवलं होतं असं सांगत भुजबळांनी श्रेयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, मनसेचे शिष्टमंडळ, निवडक पत्रकारांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

आचार संहितेपूर्वी सरकारने टोल धोरण ठरवण्याचं आश्वासन दिलं आहे, जोपर्यंत टोलधोरण ठरवलं जात नाही, तो पर्यंत टोल भरू नका, आणि टोल कुणी जबरदस्तीने मागितला, तर कंत्राटदाराच्या घरी आम्ही काय थैमान घालतो, ते पाहा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला होता


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 13, 2014, 21:25


comments powered by Disqus