वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो सावधान..., Traffic rules gets stricts

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

वाहतूकीचे नियम मोडण्याचा चुकूनसुद्धा विचार करत असाल, तर तुमच्यावर कठोर कारवाई होणार आहे. मुंबई ट्रॅफिक पोलीस एक नवीन योजना लागू करण्याच्या तयारीत आहेत. काय आहे हा नवा प्रस्ताव आणि काय आहे हा नवा पॉईण्ट प्लॅन...

वाहतुकीचे नियम मोडणा-या मुंबईकरांनो सावधान...

आता नुसताच दंड भरुन सुटका नाही

वाहतुकीचे नियम मोडणा-या मुंबईकरांची आता गय नाही.... त्यांना शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलीस सॉलिड प्लॅन आखतायत.

वारंवार वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर दुप्पट दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव याआधी मुंबई ट्रफिक पोलीसांनी राज्य सरकारला पाठवला होता, पण, केंद्र सरकारनं तो प्रस्ताव फेटाळला, त्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कायद्याचा वचक रहावा यासाठी आता गुणात्मक पद्धतीचा प्रस्ताव मुंबई ट्रफिक पोलीसांनी तयार केलाय

ही योजना काय आहे, ती समजून घेऊयात.... झेब्रा क्राँसिंग, सिग्नल तोडणं, नो पार्किंग, लेन मोडणं, फँन्सी नंबर प्लेट, हेल्मेट न घालणं, सिट बेल्ट न लावणं, ट्रिपल सीट आणि नो एँट्रीसाठी एक गुण धरला जाईल. वेग मर्यादेचं उल्लघंन केल्यास ३ गुण धरले जातील, धोकादायकरित्या वाहन चालवलं तर ५ गुण धरले जातील, आणि दारु पिऊन गाडी चालवलीत तर १० गुण धरले जातील.

या गुणांप्रमाणे कारवाईही कठोर होणार आहे. १० गुण मिळालेल्या व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी अपात्र केले जाईल. १५ गुण मिळालेल्या व्यक्तीचं लायसन्स ६ महिन्यांकरता अपात्र केलं जाईल. २० पेक्षा जास्त गुण मिळाललेल्यांचं लायसन्स थेट रद्द होईल. तसंच परमिट निलंबनाची कारवाईही केली जाईल, तर ३० पेक्षा जास्त गुण मिळालेल्या व्यक्तीचं परमिट रद्द केलं जाईल. ५० पेक्षा जास्त गुण मिळालेल्यांचं वाहतुकीचं रजिस्ट्रेशनच रद्द होणार आहे.

ही योजना फक्त मुंबई पुरती नव्हे, तर कुठल्याही राज्यात वाहतुकीचा नियम मोडला तरी ते गुण धरले जाणार आहेत. त्यामुळे योजना प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल पण सगळ्यात वाहनधारकांनो आणि वाहनचालकांनो आतापासूनच वाहतुकीची शिस्त पाळा आणि अपघात टाळा....


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 31, 2013, 23:18


comments powered by Disqus