Last Updated: Tuesday, April 16, 2013, 11:06
www.24taas.com, मुंबईवडाळ्यातील व्हिडिओ पार्लर व्यवसायिक राजू सोनी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री दोघांना अटक केली आहे. इब्राहिम आणि हसन अशी या दोघांची नावं आहेत.
हसन आणि इब्राहिम यांनी आपल्या पाच सहकाऱ्यांसमवेत रविवारी सोनी यांची हत्या केली होती. सोनी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानं त्यांची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच या प्रकरणातल्या ५ फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
First Published: Tuesday, April 16, 2013, 11:00