Last Updated: Monday, June 16, 2014, 10:18
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे दोन मोठे प्रकल्प आज मुंबईकरांसाठी खुले होणार आहेत.
कोणत्याही अडथळ्याशिवाय दक्षिण मुंबईतून थेट घाटकोपरपर्यंत जाणारा ईस्टर्न फ्रीवेचा दुसरा टप्पा तसेच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदणारा खेरवाडी जंक्शन फ्लायओव्हर मुंबईकरांचा प्रवास फास्ट करणार आहे.
खेरवाडी जंक्शन फ्लायओव्हरखेरवाडी जंक्शन इथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. यामुळे पश्चिम उपनगरातून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेमार्गाने शहरामध्ये येणा-या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खेरवाडी फ्लायओव्हरच्या दक्षिण दिशेकडील मार्गिकेचे आज दुपारी तीन वाजता तर ईस्टर्न फ्रीवेच्या पांजरपोळ ते घाटकोपर या अंतिम टप्प्याचे साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
580 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम 226 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे.
`ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री वे`चा नवा मार्गईस्टर्न एक्स्प्रेस फ्री वे या नव्या मार्गांमुळे दक्षिण मुंबईतून आलेली वाहने चेंबूर येथे न रखडता थेट घाटकोपर गाठतील.
तर तिथून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेही जवळ असल्यामुळे वाशी आणि ठाण्याच्या दिशेनेही जलद प्रवास करता येणार आहे.
विशेष म्हणजे फ्रीवे वर कोणताही सिग्नल नसल्याने प्रवाशांचा वेळ आणखीनच वाचणार आहे. या नव्या मार्गामुळे दादर, सायन, चेंबूर, कुर्ला आणि मानखुर्दमध्ये होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 16, 2014, 10:18